धारदार शस्त्रासह हद्दपार आरोपीस अटक

On: May 26, 2023 10:26 AM

जळगाव : हद्दपारीचे आदेश असतांना देखील जळगाव शहरात धारदार शस्त्र बाळगत वावरणा-या तरुणास अटक करण्यात आली आहे. महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत असे गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी हद्दपार तरुणाचे नाव आहे. त्याला जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

अटकेतील महेश लिंगायत याच्या कब्जातून लोखंडी कुकरी हस्तगत करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गु.र.न. 161 मुंबई पोलिस कलम 42 व शस्त्र अधिनियमानुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. भास्कर ठाकरे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment