घर पेटवून दिल्याप्रकरणी दोघांना अटक

On: May 26, 2023 11:50 AM

जळगाव : भुसावळ तालुक्यातील तालुक्यातील वांजोळा येथे एका गुन्ह्यातील संशयित तरुणाचे घर पेटवून नातेवाईकांना मारहाण झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली होती. या घटनेप्रकरणी चौघांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

वांजोळा येथील रहिवासी असलेले भीमराव गंभीर तायडे यांच्या साडूचा मुलगा कैलास अशोक तायडे हा एका गुन्ह्यात संशयित आरोपी आहे. तो बुधवारी भीमराव तायडे यांच्याकडे पाणी पिण्यासाठी आला होता. यामुळे संशयित कैलास यास तायडे व त्याचा परिवार गुन्ह्यात मदत करत असल्याचा संशय बळावला. त्यातून तायडे यांना मारहाण झाली.

फिर्यादीचा पुतण्या रोशन तायडे व कृष्णा तायडे हे वाद सोडवण्यासाठी आले असता संशयितांनी त्यांनाही शिविगाळ व मारहाण केली. संशयितांनी कैलास अशोक तायडे याच्या घरात प्रवेश करून पेट्रोल टाकून ते पेटवून दिले. या आगीत घरासह साहित्याचे नुकसान झाले. भीमराव तायडे यांच्या फिर्यादीवरून पंकज निवृत्ती तायडे, रवींद्र आनंदा मोरे, साधना रवींद्र मोरे, सुभाष वणा मोरे (रा. वांजोळा, ता. भुसावळ) यांच्यावर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment