नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन ९-१० सप्टेंबरला सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संसदीय सचिवालयाकडून या बाबतची माहिती सरकारला देण्यात आली आहे. त्या आधारे केंद्रीय मंत्रिमंडळ २६ ऑगस्ट रोजी ला बैठकीत निर्णय घेवु शकते.कठोर नियमावलीने सुरु होणा-या या अधिवेशनाच्या कालावधीत कपात केली जात आहे. संसदेतील बैठक व्यवस्थेबाबत दोन्ही सभागृहांचे सचिवालय अजून विचार विनीमय करत आहेत.
संसदीय केंद्रीय कक्षात माजी खासदारांसह ५५ ते ६० वर्ष अथवा त्याहून जास्त वयाच्या पत्रकारांना संसद परिसरात प्रवेश मिळणार नसल्याचे समजते. संसद अधिवेशन सुरु होण्याचे वृत्त समजताच कॉंग्रेसने विरोधी पक्षांना हाताशी धरुन सरकारला कोंडीत घेरण्याची योजना आखल्याची तयारी सुरु केली आहे. प्राप्त माहितीनुसार गुलामनबी आझाद यांनी माकपा, सपासह इतर काही पक्षांच्या नेत्यांसमवेत चर्चा सुरु केल्याचे समजते.