3 कोटीचे सोने, 17 लाखांच्या रोकडसह बॅंकेतून पसार होणा-या लुटारुंविरुद्ध गुन्हा

On: June 1, 2023 7:35 PM

जळगाव : आज सकाळीच जळगाव शहरातील स्टेट बॅंकेच्या मॅनेजरवर चाकूचे वार करुन बॅंकेतून कोट्यावधी रुपयांचे सोने आणि लाखोची रोकड घेवून जाण्याची घटना घडली. आज दिवसभर या घटनेची चर्चा जळगाव शहर आणि जिल्ह्यात सुरु होती. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. लुटारुंची हिम्मत वाढल्याचे या घटनेतून दिसून आले आहे.

जळगाव  शहरातील कालिंका माता मंदीर परिसरातील स्टेट बॅंक शाखेत आज सकाळी दोघा दरोडेखोर तरुणांनी बॅंकेत  प्रवेश केला. सर्वात अगोदर बॅंक व्यवस्थापकाच्या मांडीवर चाकूने वार करुन त्यांना जखमी करण्यात आले. इतर कर्मचा-यांना चाकूचा धाक दाखवून सुमारे 3 कोटी 75 लाख रुपयांचे सोने आणि 17 लाख रुपयांची रोकड घेवून पलायन करण्यात दोघे जण यशस्वी झाले आहेत. या घटने प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गु.र.नं. 93/23 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांची गर्दी होण्यापूर्वीच लुटारुंनी आले काम सोपे करून घेतले. या गुन्ह्याचा तपास पोलिस प्रशासनाला एक आव्हान आहे.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment