जैन हिल्स जळगाव येथे रविवारपासून फाली संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्यास आरंभ

On: June 3, 2023 10:39 PM

जळगाव, ३ जून (प्रतिनिधी):– जैन हिल्स येथे Future Agriculture Leaders of India (फाली) उपक्रमा अंतर्गत हे ९ वे वर्ष असून ते १ व २ जून रोजी पहिला टप्पा यशस्वी पार पडला. या संम्मेलनाचा दुसरा टप्पा रविवारी ४ जून रोजी सुरू होत आहे. असे फाली संम्मेलनाच्या आयोजकांनी कळविले आहे.  

गत आठ वर्षांपासून महाराष्ट्र व गुजरात राज्यातील विद्यार्थी सहभागी होत असतात. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी ४ जून रोजी जैन सिंचन, फळ प्रक्रिया, टिश्यू कल्चर आणि इतर प्रक्रियाची माहिती दिली जाईल आणि सायंकाळी फाली विद्यार्थी आधुनिक, प्रगतशील शेतकऱ्यांशी चर्चा करतील. दुसऱ्या दिवशी ५ जून रोजी जैन हिल्स येथील विविध सभागृहात सकाळी ८.०० ते १०.३० दरम्यान फालीचे विद्यार्थी आपले बिझनेस प्लॅन सादरीकरण करतील. या सोबतच शेती विषयक नाविन्यपूर्ण संशोधन व संकल्पनेचे स्टॉल्स जैन हिल्स येथील आकाश ग्राऊंड येथे मांडले जातात. आपण स्वतः विकसीत केलेल्या इन्होव्हेशन्सची माहिती विद्यार्थी देतात. कृषी विषयक मॉडेल्स, संकल्पनांचे सादरीकरण सोमवार ५ जून ला सकाळी ११.०० पासून सुरू होईल.

त्यासाठी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व फाली असोसिएशनचे चेयर पर्सन अनिल भाऊ जैन, गोदरेज ऍग्रीवेटचे कार्यकारी संचालक बुर्जिस गोदरेज, स्टार ऍग्रीचे चेअरमन बी.बी पटनायक, फाली असोसिएशनच्या व्हॉइस चेयर पर्सन नॅन्सी बेरी या मान्यवरांची उपस्थिती राहील. फालीच्या विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण बिझनेस मॉडेल्स व कृषी इन्होव्हेशन्सच्या पहिल्या पाच क्रमांकाची निवड करतात.  या दोन्ही स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment