चाकू हल्ल्यात तरुणाचा मृत्यू – जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल

On: June 7, 2023 10:13 AM

जळगाव : जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात मंगळवार 6 जूनच्या रात्री झालेल्या चाकू हल्ल्यात तरुणाचे मृत्यूशी झुंज देत असतांना आज सकाळी निधन झाले आहे. गंमत सहन न झाल्याने दोघा तरुणांकडून एकावर चाकू हल्ल्याचा हा प्रकार झाल्याचे म्हटले जात आहे. अविनाश निंबा अहिरे असे जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी असलेल्या मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

अमोल  गवळी आणि साहील पठाण असे चाकूने हल्ला करणा-या पिंप्राळा येथील रहिवासी असलेल्या संशयीत तरुणांची नावे आहेत. दोघा तरुणांच्या मागावर पोलिस असून या घटने प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गु.र.न. 155/23 भा.द.वी. 307, 302 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment