पंतप्रधान मोदींसाठी खास एअर इंडिया वन विमान

    air india one

    अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वापरतात तशा एअरफोर्स वन या विमानाप्रमाणे भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी खास एअर इंडीया वन हे व्हीव्हीआयपी विमान तयार झाले आहे. अशा प्रकारचे विमान तयार करण्यची तयारी गेल्या कित्येक वर्षापासून सुरु होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी नव्या स्वरुपातील व्हीव्हीआयपी विमान तयार झाले असून ते लवकरच पुढील आठवड्यात दिल्लीत येणार आहे.

    विशेष बनावटीची बोईंग ७७७-३०० ईआर अशी दोन विमाने मागवण्यात आली आहेत. यापैकी एक विमान पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तर दुसरे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वापरासाठी राहणार आहे. या दोन्ही विमानांची रचना व मेकींग अमेरिकेत सुरु आहे. ही नवीन विमाने आल्यानंतर एअर इंडियाच्या व्हीव्हीआयपी ताफ्यामधून २५ वर्षे जुनी बोईंग ७४७ विमाने काढून टाकण्यात येणार आहेत.

    एअर इंडिया वन भारतात आणण्यासाठी एअर इंडिया, भारताचे हवाई दल तसेच सरकारच्या काही अधिका-यांसह  सुरक्षा रक्षकांचे पथक अमेरिकेत रवाना झालेले आहेत. एअर इंडिया वन विमानात अॅडव्हान्स आणि सिक्युअर कम्युनिकेशन सिस्टिम बसवण्यात आली आहे. ही विमाने एअर कमांडच्या स्वरुपात काम करतात. या विमानातील ऑडिओ-व्हिडीओ प्रणालीला टेप अथवा हॅक करता येत नाही. या विमानाच्या खरेदीवर ८ हजार ४५८ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here