तिजोरीसह रोकड, चांदी आणि डिव्हीआर चोरी

On: June 12, 2023 6:13 PM

जळगाव : जळगाव तालुक्यातील जळके येथे सराफी दुकानातील तिजोरीसह रोख रक्कम, चांदी तसेच सीसीटिव्ही डिव्हीआर असे साहित्य चोरी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. दुकान मालक मनोज प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरी येथील रहिवासी मनोज प्रकाश पाटील यांचे जळके येथे कृष्णा ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. या दुकानाचे चॅनल गेट आणि शटर सकाळी उघडे दिसून आले. वसंतवाडी गावाचे सरपंच विनोद पाटील यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच दुकान मालक मनोज पाटील यांना कळवला. त्यांनी दुकानात जावून पाहीले असता दुकानातील लोखंडी तिजोरी, तिजोरीतील 2400 ग्रॅम वजनाची चांदी, ड्रावरमधील दहा हजार रुपये रोख आणि दहा हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा 2 लाख 35 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी झाल्याचे लक्षात आले.  या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment