तरुणाच्या मृत्यू प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल

On: June 18, 2023 8:52 AM

जळगाव : जुन्या वादातून झालेल्या झटापटी दरम्यान तरुणाच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल शांताराम शेळके असे मरण पावलेल्या भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील तरुणाचे नाव आहे. राहुल तुकाराम पाडळे असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपी तरुणाचे नाव आहे.

भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील मंगल शांताराम शेळके आणि राहुल तुकाराम पाडळे या दोघा तरुणांचा जुना वाद होता. या वादातून 16 व 17 जूनच्या दरम्यान रात्रीच्या वेळी दोघात फेकरी उड्डाण पुलाजवळ सर्व्हिस रोडवर जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. जुना वाद उकरुन राहुल पाडळे याने मंगल शेळके याची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ करत त्याचेसोबत झटापट केली. मंगल यास राहुलने मोटार सायकलवर जोरात ढकलून दिल्याने त्याच्या डॉक्याला गंभीर दुखापत झाली.  

17 जून रोजी मयत मंगल शेळके याचा भाऊ आकाश शेळके याने दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयीत राहुल पाडळे याला अटक करण्यात आली आहे. परिविक्षाधीन उप विभागीय अधिकारी सतिश कुलकर्णी पुढील तपास करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment