शिबू सोरेन यांना कोरोना

On: August 22, 2020 12:01 PM

झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष तथा राज्यसभा सदस्य शिबू सोरेन यांच्यासह त्यांची पत्नी रूपी सोरेन यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दोघांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

शिबू सोरेन यांच्या निवास्थानी तैनात सतरा कर्मचारी व सुरक्षारक्षकांना कोरोना झाला होता. त्यानंतर 74 वर्षाचे शिबू सोरेन व त्यांच्या पत्नीची कोरोना तपासणी करण्यत आली होती. त्यात दोघे पॉझिटिव्ह आढळले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची देखील कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात ते निगेटिव्ह आढळले. यापुर्वी झारखंडचे कॅबिनेट मंत्री बन्ना गुप्ता कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. सर्व मंत्रीमंडळाची कोरोना तपासणी केली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment