डोक्यात फरशी मारुन पतीने केला पत्नीचा खून

On: June 19, 2023 8:43 PM

जळगाव : डोक्यात फरशी मारुन पतीने पत्नीचा खून केल्याची घटना एरंडोल येथे उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला संशयीत पतीविरुद्ध पत्नीच्या खूनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षदा किरण मराठे असे मयत पत्नीचे तर किरण महादू मराठे असे संशयीत आरोपी पतीचे नाव आहे.

एरंडोल शहरातील गांधलीपुरा येथे मराठे दाम्पत्य वास्तव्याला आहे. गेल्या काही दिवसांपासून या पती पत्नीमधे घरगुती कारणावरुन वाद सुरु होते असे समजते. या वादातूनच हा खूनाचा प्रकार झाला असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिस स्टेशनचे पो.नि. सतीष गोराडे व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. आज 19 जून च्या दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. संशयीत पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment