जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

On: June 20, 2023 8:29 PM

जळगाव : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. युसुफ शेख उर्फ चिल्या असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जळगाव शहर पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा सन 2022 मधे दाखल होता. जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरात ख्रिश्चन बांधवांच्या स्मशान भुमी भागात एकाला अडवून त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम दोघांनी हिसकावून नेली होती. हा गुन्हा युसुफ शेख उर्फ चिल्या याने केल्याचे तपासाअंती उघडकीस आले. युसुफ शेख याच्या अटकेमुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील  हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, विजय पाटील, प्रितमकुमार पाटील, किरण धनगर, ईश्वर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील टोल नाका परिसरात तो पोलिस पथकला मिळून आला. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. जबरी चोरीतील रक्कम त्याने खर्च झाल्याचे त्याच्याकडून सांगण्यात येत आहे. अटकेतील युसुफ यास पुढील तपासकामी जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment