नवी दिल्ली : स्टेट बॅंकेने आपल्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. पैसे काढण्यासाठी ग्राहकांना आता घराबाहेर जाण्याची गरज राहणार नाही. एसबीआय एटीएम आता ग्राहकांच्या दारी पोहोचणार आहे. स्टेट बॅंकेने या योजनेला सुरुवात देखील केली आहे.यासाठी तुम्हाला एटीएम केंद्रावर जाण्याची गरज नाही. केवळ एक व्हॉट्सअॅप मेसेज टाइप केल्यावर एसबीआयचे मोबाईल एटीएम तुमच्या दाराशी येणार आहे.
स्टेट बँके लखनऊचे मुख्य व्यवस्थापक जय कुमार खन्ना यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी लखनऊ सर्कलमध्ये SBI Whats App आणि SBI phone call service प्रत्यक्षात सुरु केल्याचे जाहिर केले आहे. एसबीआयची ही योजना खरोखर यशस्वी झाली तर देशातील इतर शहरात देखील ही सुविचा राबवली जाणार आहे.