महिला डॉक्टरला वारंवार स्पर्श – एकाविरुद्ध गुन्हा

On: June 23, 2023 8:20 AM

जळगाव : दवाखान्यातील गर्दीचा गैरफायदा घेत महिला डॉक्टरला वारंवार स्पर्श करुन तिचा विनयभंग करणा-या एका जणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील सद्गुरु नगर परिसरातील दवाखान्यात महिला डॉक्टरच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.

महिला डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.न. 442/2022 भा.द.वि. 354 अ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 जून रोजी सायंकाळी दवाखान्यात गर्दी होती. त्या गर्दीचा गैरफायदा घेत सद्गुरु नगर मधील संबंधीत इसम महिला डॉक्टरला वारंवार स्पर्श करत होता. त्यामुळे ती महिला डॉक्टर वैतागली. रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या 47 वर्ष वयाच्या महिला डॉक्टरने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत 22 जून रोजी संबंधीत इसमाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. हे.कॉ. विजय पाटील पुढील तपास करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment