मुख्यमंत्र्यांसह ना.आठवले यांचे फोटो लावून सुरु होता पत्त्यांचा क्लब

On: June 24, 2023 8:18 AM

छ. संभाजीनगर : आरपीआय आठवले गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या बंगल्यात सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबवर टाकलेल्या छाप्यात आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी टाकण्यात आलेल्या या छाप्याने खळबळ माजली आहे. आरपीआय  आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पंढरीनाथ इंगळे यांच्या बंगल्यात सुरु असलेल्या या क्लबचे एका रुमचे रोजचे भाडे तिन हजार रुपये आणि एका डावाचे दहा टक्के कमिशन घेतले जात होते. या क्लबमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह इतर राजकीय नेत्यांचे फोटो लावून अव्याहतपणे हा क्लब सुरु होता. गेल्या नऊ वर्षापासून सुरु असलेल्या या क्लबवर पोलिसांनी छापा टाकला.

पोलिसांनी बाळकृष्ण इंगळे यांच्यासह जुगार खेळणारे वसीम हारुन कासम कुरेशी (पटेलनगर चिखलठाणा), अक्षय अशोक मगरे बौद्धवाडा चिकलठाणा), राजेंद्र काशिनाथ मरमट (हनुमान नगर गारखेडा), गणेश भगवान पवार (विजय नगर), अनिल उखर्डू सपकाळे (भालगाव फाटा), दत्ता अमृत सुरवसे (विजयनगर), आकाश कल्याणराव जाधव (मुकुंदनगर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.   35 हजार 330 रुपये रोख,मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 2 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.                                                             

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment