नाश्त्याची गाडी आम्हीच लावून कमाई करणार – जळगाव रेल्वे स्टेशनवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा

On: June 25, 2023 8:34 AM

जळगाव : नाश्त्याची गाडी आम्हीच लावणार आणि आम्हीच कमाई करणार असे म्हणत जळगाव रेल्वे स्टेशनवरील एका स्टॉल धारकाने दुस-या स्टॉल धारक विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ला प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

दिपक दत्तू चौधरी हा तरुण जळगाव रेल्वे स्टेशनवर चहा विक्रीची हातगाडी लावतो. त्याच ठिकाणी महेश आधार सोनवणे, दिपक आधार सोनवणे, पवन आधार सोनवने, मोनल रत्नेकर आणि पवी जोशी अशा सर्वांनी मिळून चहाची हातगाडी लावणा-या दिपक दत्तू चौधरी यास 23 जून रोजी शिवीगाळ केली. याशिवाय लाथाबुक्क्यांनी  मारहाण करत त्यांच्याकडील टोच्या, भाजीचा स्टीलचा मोठा चमचा, धारदार विळा दिपक चौधरी याला मारुन जखमी केले. त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. सामान्य रुग्णालयात त्याने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला हल्लेखोर सर्वांविरुद्ध भा.द.वि. 307 व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. किशोर पवार करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment