कत्तलीसाठी जाणा-या चोरीच्या पशुधनाचा बचाव – आठ अटकेत

On: June 25, 2023 9:41 PM

जळगाव : कत्तलीच्या हेतूने चोरीच्या पशुधनाची वाहतुक करणा-या आठ जणांना त्यांच्या ताब्यातील वाहनांसह एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईत एकुण 55 बैलांची कत्तलीपासून सुटका झाली आहे. एक लेलँड वाहन (एमएच 19 सीवाय 2330), एक छोटा हत्ती वाहन (एमएच 47 ई 3014) आणि एक महींद्रा बोलेरो पिकअप वाहन अशी तीन वाहने देखील ताब्यात घेण्यात आली आहेत. या कारवाईमुळे कत्तलीसाठी पशुधनाची चोरटी वाहतुक करणा-यांच्या गोटात खळबळ माजली आहे.

जळगाव शहरातील मास्टर कॉलनी, कुरेशी मोहल्ला, पिरजादे वाडा, अक्सा नगर मेहरुण भागात काही चोरीचे पशुधन वाहनात अवैधपणे कोंबून ते कत्तलीसाठी नेले जात असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनला समजली होती. त्या माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. मेहरुण परिसरातील मास्टर कॉलनीत पहिली कारवाईची मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत  1 लाख 94 हजार रुपये किमतीच्या पंधरा बैलांचा बचाव करण्यात आला. या कारवाईत शेख राजीक शेख रफिक, शेख रेहान शेख युसूफ कुरेशी (वरणगांव जि जळगाव), अदनान कय्युम खान (रा दत्तनगर मेहरुण जळगाव), इफ्तेखार शरीफ खान (रा. मास्टर कॉलनी जळगाव), सरफराज रहीम शेख (रा, मास्टर कॉलनी जळगाव), सैय्यद वाजीद सैय्यद इब्राहीम (रा. रथ चौक, जुने जळगाव) व सैय्यद अनीस सैय्यद हमीद मन्यार (रा. मन्यार मोहल्ला मेहरुण जळगाव) आदींना अटक करण्यात आली.

दुस-या कारवाईत अक्सा नगर मेहरुण जळगाव येथे पत्र्याच्या शेड मध्ये असरार शेख मुक्तार शेख, एक अल्पवयीन व सत्तार शेख (रा अक्सा नगर, मास्टर कॉलनी मेहरुण जळगाव) यांच्या ताब्यातून चोरीचे 3 लाख 10 हजार रुपये किमतीचे चाळीस बैल हस्तगत करण्यात आले. असरार शेख मुक्तार यास अटक करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही कारवाई दरम्यान एकुण 5 लाख 4 हजार रुपये किमतीचे पशुधन त्यात एकुण 55 बैल, गुन्ह्यात वापरलेली तिन वाहने जप्त करण्यात आली असून एकुण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेका प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, राजेंद्र कांडेलकर, दिपक चौधरी, पोना, सचीन पाटील, योगेश बारी, ईमरान सेव्यद, किशोर पाटील, किरण पाटील, मंदार पाटील, चेतन पाटील, महोला पोलीस अंमलदार, आशा पांचाळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment