जळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत आषाढी एकादशी निमित्त शालेय परिसरात शाळेतील विद्यार्थीनी यांनी पंढरपूर येथील वारीचा, दिंडी सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतला. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून गौरविले जाते. संतांचे कार्य केवळ अध्यात्मिक क्षेत्रापुरतेच नाही तर समाज सुधारणेतही त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. त्यांनी निर्माण केलेल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आजही अव्याहतपणे चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आषाढी एकादशी निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या मनात अध्यात्मिक भावना रुजावी याकरिता आज दिनांक 28 जून 2023 रोजी शालेय परिसरातील गणेश कॉलनी भागात दिंडी सोहळ्याचे तसेच स्वच्छता रॅलीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.
या वारीत परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व फलकावरील घोषणेव्दारे करण्यात आले.पंढरपूर येथील वारीचा प्रत्यय येण्याकरिता शाळेतील विद्यार्थीनी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाप्रमाणे वेशभूषा परिधान करून गळ्यात तुळशीहार, हातात टाळ, ,ढोल घेऊन आनंदाने पाऊली नृत्य सादर केले. दिडींत पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता झाडे लावा झाडे जगवा व स्वच्छेतेचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना सौ.सुनिता उपासनी मॅडम यांनी केली. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गांधी रिसर्च फाउंडेशनचे श्री.मदन लाठी व श्री. हेमंत बेलसरे यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमाचे अनमोल मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिक सौ.स्वाती नेवे मॅडम यांनी केले . सदर कार्यक्रमास सकाळ विभाग प्रमुख श्री. अनिल सैंदाणे दुपार विभाग प्रमुख सौ.वंदना तायडे,ज्येष्ठ शिक्षिका सौ.मीना सपकाळे ,कार्यानुभव प्रमुख सौ.अंजली कुलकर्णी उपस्थित होते. स्वच्छता घोषवाक्य फलक शाळेच्या चित्रकला विभाग प्रमुख सौ.अनिता फुलपगारे यांनी केले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक बंधू भगीनी तसेच शिक्षकेतर बंधू भगीनींचे सहकार्य लाभले