तायक्वांदो स्पर्धेत जैन अकॅडमीच्या रुतिकची निवड

जळगांव : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्टस् असोसिएशन तथा युवासेना रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३३ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर मुले व मुली तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन दिनांक २४ ते २६ जून २०२३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले होते.

सदर स्पर्धेचे उद्घाटन माननीय नामदार श्री उदय सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत महाराष्ट्रतुन २८ जिल्ह्यांतील खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा ९ मुले व ६  मुलींचा संघ सहभागी झाला होता यामध्ये मुलांच्या ७८ किलो वरील वजन गटात रूतिक दिपक कोतकर याने सुवर्ण पदक पटकावले व ६ ते ९ जुलै २०२३ शिमोगा, कर्नाटक येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रचा संघात निवड झाली आहे. त्याला प्रशिक्षक जयेश बाविस्कर ( एन आय एस  ) याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले.

त्याच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे नरेंद्र महाजन तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे सर तसेच राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ श्री अविनाश बारगजे सर, मिलिंद पठारे महासचिव, प्रविण बोरसे, दुलीचंद मेश्राम, व्यंकटेश कररा आदींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेतील इतर विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे मुलींच्या ५५ किलो आतील वजन गटात कु निकीता दिलीप पवार ( कांस्यपदक ), लोकेश महाजन ( कांस्यपदक ), यश जाधव ( कांस्यपदक ) सदर खेळाडूंना जयेश कासार, सुनील मोरे, श्रेयांग खेकारे याचं मार्गदर्शन लाभले 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here