चाळीसगावला घरफोडी – सव्वा लाखांचा ऐवज लंपास

On: June 30, 2023 11:38 AM

जळगाव : चाळीसगाव शहरातील करगाव रस्त्यावरील देवकर नगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 97 हजार रुपये रोख, 2 हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, 20 हजार रुपये किमतीचे चांदीचे ताट, अडीच हजार रुपये किमतीचे चांदीचे लॉकेट पेंडल असा एकुण1 लाख 21 हजार 700 रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी नेला आहे.

चाळीसगाव शहरातील करगाव रस्त्यावर देवकर नगरात अनिल वामनराव विसपुते हे लॅंड डेव्हलपर राहतात. 27 जुलै रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान भर दिवसा घरफोडीची ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. दिपक बिरारी करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment