जळगाव : अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना पंधरा वर्षाच्या मुलीसोबत लग्न करुन ती सासरी आल्यानंतर तिच्यासोबत बळजबरी शरीर संबंध करणा-या पतीसह तिच्या आईवडिलांना दमदाटी करणा-या इतर सर्वांविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन पीडीत मुलगी माहेरी आल्यानंतर तिने सासरी जाण्यास नकार दिला. त्यामुळे सासरच्या मंडळींनी मुलीच्या आईवडिलांना लग्नासाठी झालेला खर्च मागण्यासह शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने मेहुणबारे पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण आणि इतर कलमानुसार भाग 5 गु.र.न. 172/23 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विष्णु गायकवाड करत आहेत.