आजचे राशी भविष्य (2/7/2023)
मेष : स्थावर इस्टेटीच्या रखडलेल्या कामांना गती येईल. मानसिक शांतता लाभेल व आरोग्यही उत्तम राहील.
वृषभ : आज विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. लेखक व कवींच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल.
मिथुन : व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळेल. उत्पन्नाचे विविध मार्ग खुले होतील.
कर्क : आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. गरजूंना तत्परतेने मदत कराल.
सिंह : काही दूरचे नातलग संपर्कात येतील. मोठेपणा जपण्यासाठी खर्च कराल. दूरचे प्रवास संभवतात.
कन्या : आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील.
तूळ : भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल. सहकारी तुमच्या मताचा आदर करील.
वृश्चिक : कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीरीत्या हाताळाल. ज्येष्ठांना उपासनेचे फळ मिळेल.
धनू : कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. आज वेट अँड वॉचचे धोरण ठेवा.
मकर : आज धंद्यातील आवक-जावक जेमतेम राहील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने खुश होतील.
कुंभ : काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे.
मीन : वेळात वेळ काढून थोडी चैन करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र खरेदी कराल.