जळगाव : फैजपूर आणि जामनेर या दोन पोलिस स्टेशनला बलात्काराचे एकुण तिन गुन्हे दाखल झाले आहेत. फैजपूर पोलिस स्टेशनला दाखल दोन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यातील संशयीत आरोपीस अटक करण्यात आली असून एका गुन्ह्याचा तपास उप विभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्याकडे आहे.
फैजपूर पोलिस स्टेशनला दाखल एका गुन्ह्यात रावेर तालुक्यातील वडगाव येथील रामचंद्र संघरत्न वाघोदे यास संशयीत आरोपी करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील पिडीत गृहीणीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्यासोबत रामचंद्र वाघोदे याने प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला लग्नाचे आमिष दाखवले. बामणोद या गावी, वडगाव गारबर्डी धरण, भुसावळ येथील हॉटेल साई पॅलेस आणि हॉटेल कन्हैयाकुंज आदी ठिकाणी तिला नेवून तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यात ती गर्भवती राहिली. तिला आयुर्वेदीक गोळ्या देवून तिचा गर्भपात करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास फैजपूर पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक एम.जे.शेख करत आहेत.
फैजपूर पोलिस स्टेशनला दाखल दुस-या गुन्ह्यात फैजपूर येथील गृहीणीसोबत फैजपुर येथीलच सर्फराज सईदखान या चोवीस वर्षाच्या तरुणाने प्रेमसंबंध निर्माण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवत तो तिला सहा महिन्यापासून वेळोवेळी फैजपूर, मुंब्रा, जळगाव येथील लॉजवर वेळोवेळी घेवून गेला. त्याठिकाणी त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. ती गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करत आहेत. या गुन्ह्यातील संशयीत आरोपीस अद्याप अटक झालेली नाही.
जामनेर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात अल्पवयीन पिडीत मुलगी फिर्यादी आहे. तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत एका महिलेच्या मदतीने तिच्याच घरात सोनू बाळू पडोळ याने शरीर संबंध प्रस्थापीत केल्याचा आरोप आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला. हा प्रकार करण्यासाठी वापरण्यासाठी घर देणारी महिला आणि सोनु पडोळ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सोनू पडोळ यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उप विभागीय अधिकारी धनंजय येरुळे करत आहेत.