हिंदू धर्माचा अपप्रचार करणा-या ख्रिश्चन धर्म प्रचारकांविरुद्ध गुन्हा

On: July 2, 2023 9:43 PM

जळगाव : भगवान येशूची प्रार्थना केली नाही तर तुमचे वाईट होईल, तुम्ही ख्रिश्चन धर्मात प्रवेश करा तुमचे सर्व आजार दूर होतील असे प्रवचनाच्या माध्यमातून सांगत भोळ्या आणि अशिक्षीत लोकांना ख्रिश्चन धर्मात प्रवेश करण्यास सांगणा-या चौघा ख्रिश्चन धर्म प्रचारकांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव भुसावळ महामार्गावरील मंगलम लॉन येथील हॉलमधे जमलेल्या सुमारे तिस ते चाळीस जणांसमोर प्रवचनाच्या माध्यमातून हा प्रचार सुरु होता. ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यानंतर तुमचे सर्व रोग दुर होतील असा प्रचार आणि हिंदू धर्माबाबत अपप्रचार सुरु असल्याचे बघून किर्तनकार तथा कथाकार योगेश कोळी यांनी याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

किर्तनकार योगेश कोळी यांना चुलत भावाच्या वाढदिवसानिमीत्त हॉल हवा होता. त्यामुळे ते महामार्गावरील हॉल बघण्यास आले असता त्यांना ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि हिंदू धर्माचा अपप्रचार सुरु असल्याचे दिसून आले. केवळ ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यानंतरच तुमचे विकार नाहीसे होतील असा प्रचार या ठिकाणी सुरु असल्याचे दिसून आले. जमलेल्या भोळ्या आणि अशिक्षीत लोकांना धर्म बदल करण्याची इच्छा नव्हती. सिना संतोष पाटील (रा. कोल्हे हिल्स जाणता राजा शाळेजवळ जळगाव मुळ रा. केरळ), पवन दिपक सारसर (रा. मण्यारखेडा), राजकुमार हरिशंकर यादव (रा. खेडी मुळ रा. उत्तर प्रदेश), प्रदीप बाजीराव भालेराव (रा. वाघनगर जळगाव) अशा चौघांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment