तरुणाच्या मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल – चौघांना अटक

On: July 3, 2023 8:27 PM

जळगाव : वरणगाव नजीक फुलगाव येथील मजूर तरुणाच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पंकज रामचंद्र सोनवणे (रा. चिंचोल ता. मुक्ताईनगर) असे चौघांच्या मारहाणीत मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. अविनाश पाटील, विजय सुधाकर चौधरी, संतोष मुरलीधर कोलते, सुपडू उर्फ नरेंद्र यशवंत चौधरी (सर्व रा. फुलगाव ता. भुसावळ) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत तरुण पंकज सोनवणे हा मजूर  होता. त्याने शेतातील वायर चोरी केल्याच्या संशयातून त्याला चौघांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वायर चोरीचा संशय आल्यामुळे संशयीत शेतमालक अविनाश पाटील याने इतर तिघांना बोलावून घेत पंकज सोनवणे यास मारहाण केली. या घटनेत धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment