कुरिअरने आलेल्या सहा तलवारी जप्त

On: July 4, 2023 7:58 AM

नाशिक : कुरिअरने नाशिकला आलेल्या सहा तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. कुरिअरने आलेले तलवारींचे पार्सल कोपरगाव येथे जाणार होते. त्यापुर्वीचे ते जप्त करण्यात आले. विनापरवाना धारदार तलवारींची कुरिअरच्या माध्यमातून वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने अंबड पोलिसांच्या पथकाने या कारवाईला गती दिली.

अंबड गरवारे पॉईंट येथील एका कुरिअरच्या कार्यालयात हे पार्सल हरियाणा सोनीपथ येथून आले होते. हे पार्सल पुढे कोपरगाव येथे रवाना होणार होते. अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व त्यांच्या सहका-यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिसांनी कोपरगाव येथील संशयीत सचिन मोरे व हरयाणा सोनीपथ येथून तलवारी पाठवणारा संशयीत अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment