मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

On: July 5, 2023 9:43 PM

जळगाव : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संदीप गोपाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून जामनेर पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. संदीप गोपाळ हा जामनेर शहरातील आयटीआय कॉलनी येथे रहात असून तो सध्या घरी आला असल्याची माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला कारवाई व अटक करण्याकामी रवना केले होते. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, पो.ना. विजय पाटील, रणजीत जाधव, सचिन महाजन, प्रितम पाटील, संदीप सावळे, किरण चौधरी, इश्वर पाटील, लोकेश माळी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील आरोपी संदीप केशव गोपाळ यास जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment