तरुणीला गर्भवती करणा-या तरुणाविरुद्ध गुन्हा

On: July 7, 2023 7:53 AM

जळगाव : तरुणी मतीमंद असल्याचा गैरफायदा घेत गेल्या चार महिन्यापासून तिच्यासोबत शरीरसंबंध निर्माण करणा-या तरुणाविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला बलात्कारासह अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवन बापू पाटील (रा. भोंडण ता. पारोळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. पिडीतेच्या बहिणीने या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

पिडीत तरुणी 26 वर्षाची असून मतीमंद आहे. ती मतीमंद तसेच अनुसुचीत जमातीची असल्याचे माहिती असतांना जीवन पाटील याने पिडीतेसोबत गेल्या चार महिन्यापासून शरीरसंबंध प्रस्थापीत करुन तिला 17 आठवड्यांची गर्भवती केले. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी सुनिल नंदवाळकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment