मनसेच्या दोघा तालुकाध्यक्षांसह पत्रकार अटकेत

Rs. 2000 currency image

नांदेड : काल जळगाव प्रांताधिका-यांवर वाळूप्रकरणी लाचलुचपत विभागाची कारवाई झाली. जवळपास तशाच स्वरुपाची मात्र स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नांदेड येथे झाली. या कारवाईत मनसेच्या दोन्ही तालुकाध्यक्षांसह पत्रकारांवर कारवाई झाली. दोन्ही कारवायांमधील साम्य म्हणजे त्या कारवाया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाल्या.

नांदेड येथील घटनेत वाळू प्रकरणी तहसीलदारांकडून आधी पन्नास हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांकडून पुन्हा एक लाख रुपये घेणा-या मनसेच्या दोघा तालुकाध्यक्षांसह पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला होता. सापळ्यात आरोपींना अटक करण्यात आली़. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे़.

माहूरचे तहसिलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांच्या विरोधी अर्ज वेळोवेळी देवून त्याबाबत वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. भविष्यात तक्रारी न करण्यासाठी माहूरचे मनसे तालुकाध्यक्ष गजानन प्रभाकर कुलकर्णी, किनवटचे तालुकाध्यक्ष नितीन गणेश पोहरे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दुर्गादास राठोड, पत्रकार अंकुश भालेराव, राजकुमार नारायण स्वामी व कामारकर अशा सहा जणांनी तहसीलदार वरणगावकर यांना दीड लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पन्नास हजार रुपये तहसीलदार वरणगावकर यांनी अगोदर दिले होते. राहिलेले एक लाख रुपये २१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात देण्याघेण्याचे ठरले होते़.

याबाबत तहसीलदार वरणगावकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली होती. त्यानुसार सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ट्रॅप लागला. या ट्रॅप मधे वरणगावकरांकडून खंडणीची उर्वरित एक लाख रुपये घेतांना कामारकर व्यतिरिक्त इतरांना अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here