जळगाव : महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी तसेच तिचा वेळोवेळी विनयभंग केल्याच्या आरोपाखाली पारोळा येथील गटविकास अधिकारी विजय डी. लोंढे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिडीओच्या छळास कंटाळून कर्मचारी महिलेने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या.
महिलेच्या फिर्यादीनुसार गेल्या डिसेंबर 2021 पासून हा निंदनीय प्रकार सुरू आहे. बीडीओ या महिलेस दालनात बोलावून विचित्र हावभाव करत होता. या महिलेने पतीला सांगण्याची धमकी दिल्यानंतर बीडीओने तिला बदनाम करण्याचा दम दिला. जळगावला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम झाला त्या दिवशी महिलेस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
याप्रकरणी कर्मचारी महिलेने जाब विचारला असता बिडीओने तिला अजूनही वेळ गेली नसल्याचे सांगितले. या सर्व प्रकाराला वैतागून मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्या. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला बीडीओ लोंढेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फौजदार गंभीर शिंदे करत आहेत.