मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या कथीत आत्महत्येच्या तपासकामी सीबीआय पथक त्याच्या मुंबई येथील निवासस्थानी अडीच वाजता दाखल झाले. 14 जून रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी सीबीआय हत्या आणि आत्महत्येच्या दोन्ही बाबींचा शोध घेत आहे.
केंद्रीय फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (सीएफएसएल) तज्ञ आणि सीबीआय अधिकारी सातहून अधीक वाहनांनी त्याच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. “फ्लॅटमध्ये सुशांतसोबतअसलेला सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज असे दोघेजण सीबीआयच्या पथकासोबत होते.” शुक्रवारी कुक नीरजची सीबीआयने चौकशी केली. सीबीआयने शुक्रवारी बर्याच जणांची चौकशी केली आहे. सीबीआयला सर्व प्रकारच्या सहकार्याचे आश्वासन मुंबई पोलिसांकडून मिळाले आहे. मुंबई पोलिसांकडून आवश्यक ते सर्व पुरावे सीबीआयने घेतले आहेत.सुशांतचा कुक नीरजची जवळपास 14 तास चौकशी सुरु होती. केली. सीबीआयच्या पथकाने सांताक्रूझ गेस्ट हाऊसला कार्यालयाचे स्वरुप दिले आहे.