जळगाव : पावसामुळे खचलेल्या धार्मिक स्थळाच्या ओट्याचे बांधकाम करणा-या तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील सुप्रिम कॉलनी भागात असलेल्या मंदीराच्या आजुबाजुला एका विशिष्ट समुदायाची वस्ती आहे. या वस्तीतून आलेल्या जमावाकडून ओट्याचे बांधकाम करणा-या तरुणांवर 9 जुलै रोजी झालेल्या हल्ल्यात लाठ्या काठ्यांसह दगडांचा वापर झाला होता.
सुप्रिम कॉलनी परिसरात गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून एक धार्मिक स्थळ आहे. या धार्मिक स्थळावर भाविक सकाळ सायंकाळ जात असतात. या धार्मिक स्थळाच्या आजुबाजूला असलेल्या विशिष्ट समुदायाच्या जमावाला सुरु असलेले ओट्याचे बांधकाम बघून राग आला. तुम्ही या ठिकाणी ओटा का बांधत आहात असे म्हणत आलेल्या जमावाने विरोध सुरु केला. या वादाचे एका तरुणाने चित्रीकरण सुरु केले. चित्रीकरण सुरु असल्याचे बघून आलेल्या जमावाने तरुणांवर लाठा काठ्यांसह दगडाने मारहाण सुरु केली. आज इनका काम पुरा कर देंगे, ये बार बार हमारे एरीयामे आते है आज तो ए ओटा बनाने वाले सभी को जानसे मार देते है असे बोलून त्यांनी तरुणांवर मोठमोठे दगड फेकण्यास सुरुवात केली. आपला जीव वाचवण्यासाठी तरुण आपापल्या घरी मार्गस्थ झाले. त्यानंतर त्यातील एका तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.