जळगाव : लोखंडी सु-यासह हद्दपार आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. विशाल मुरलीधर दाभाडे असे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अटक करण्यात आलेल्या हद्दपार आरोपीचे नाव आहे. पो.कॉ. सतीश विठ्ठल गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पो. नि. जयपाल हिरे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या अख्त्यारीत करण्यात आलेल्या या कारवाईत पो.उप निरी. रविंद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. इम्रान सैय्यद, पो.ना. सचिन पाटील, पो.ना. सुधीर सावळे, पो.ना.मुदस्सर काझी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. मुंबई पोलीस कायदा कलम 142, आर्म अॅक्ट कलम 4/25 सह मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.