एमपीडीए कायद्याखाली जळगाव जिल्ह्यातील दोघांविरुद्ध कारवाई

On: July 18, 2023 8:38 PM

जळगाव : एमपीडीए कायद्याखाली जळगाव जिल्ह्यातील दोघांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील दिनदयाल नगर येथील शेख चांद शेख हमीद आणि चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील निखिल उर्फ पिया सुनिल कुडे अशी दोघांची नावे आहेत.

शेख चांद शेख हमीद याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला विविध कलमाखाली एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत. शिवाय चार प्रतिबंधात्मक कारवाया देखील करण्यात आल्या आहेत. निखील उर्फ पिया सुनिल कुडे याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला विविध कलमाखाली एकुण चार आणि मेहुणबारे पोलिस स्टेशनला एक असे एकुण पाच गुन्हे दाखल आहेत. याशिवाय चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला चार प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. शेख चांद शेख हमीद याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात तर निखील कुडे याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment