अट्टल गुन्हेगाराकडून चोरीच्या पाच मोटार सायकली हस्तगत

On: July 19, 2023 8:26 PM

जळगाव : जळगाव एलसीबी पथकाने केलेल्या कारवाईत अट्टल गुन्हेगाराकडून चोरीच्या पाच मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. संदिप अर्जुन गुजर (रा. शेंदुर्णी ता. जामनेर) असे मोटार सायकल चोरी करणा-या पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. संदीप गुजर हा चोरीच्या मोटार सायकली वापरत असल्याची माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे.

संदीप गुजर याने चोरी केलेल्या मोटार सायकलचे पेट्रोल संपल्यामुळे त्याने त्याच्या ताब्यातील चोरीची मोटार सायकल शिरपूर नजीक बेवारस स्थितीत उभी केली होती. त्या मोटार सायकल चोरीचा गुन्हा चाळीसगाव पोलिस स्टेशनला दाखल असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले. याशिवाय पाचोरा, पारोळा, बोदवड, चाळीसगाव या पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासकामी संदीप गुजर यास पाचोरा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश चौबे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, रजणीत जाधव, सचिन महाजन, प्रितम पाटील, अशोक पाटील, गोरख बागुल, हेमंत पाटील आदींनी या तपासकामी तसेच कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment