बापाचा अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक छळ

अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्यचार
काल्पनिक चित्र

जळगाव : जन्मदात्या बापाने आपल्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक छ्ळ केल्याची घटना अमळनेर शहरातील अंजता टॉकीज परिसरात उघडकीस आली आहे. या घृणास्पद घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून या घटनेप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील मुलीच्या आईबापाचे घरात नेहमी वाद होत असत. हा वाद सुरु झाला म्हणजे मुलीची आई घर सोडून कुठेतरी बाहेरगावी निघून जात असे. हा प्रकार नेहमीचा झाला होता. त्यामुळे घरात केवळ अल्पवयीन मुलगी आणि तिचा बाप असे दोघेच जण रहात होते. या संधीचा फायदा घेत नराधम बापाने मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. मुलीने विरोध केल्यानंतर तो तिच्या आईला मारहाण करण्याची धमकी देत असे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक हरीदास बोचरे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here