पळवून नेत तरुणीवर बलात्कार

On: July 21, 2023 11:09 AM

जळगाव : इच्छेविरुद्ध पळवून नेत तरुणीवर बलात्कार करणा-या तरुणाविरुद्ध जळगाव तालुका पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सपकाळे असे जळगाव तालुक्यातील कठोरा येथील तरुणाचे नाव आहे.

त्याने तरुणीस तिच्या इच्छेविरुद्ध मध्य प्रदेशातील इंदोर, प्रितमपुर आदी गावांना नेवून तेथील स्थानिक लॉजवर तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. जून महिन्यात वेळोवेळी घडलेल्या या घटने प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. अनंत अहिरे करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment