कोरोना वॉर्डात 350 रुपयात दारुसह खर्रा

On: August 23, 2020 12:43 PM

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय सध्या एका वेगळ्याच विषयाने चर्चेत आले आहे. या रुग्णालयातील कोरोना विभागात तिनशे रुपयात दारु व पन्नास रुपयात खर्रा मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोप जिल्हा शल्य चिकिस्तक प्रमोद खंडाते यांनी अमान्य केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिका-यांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

भंडारा येथील सामान्य रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डात एखाद्या कोरोना रुग्णाला मागणीप्रमाणे दारु व खर्रा उपलब्ध करुन देण्याचे काम काही कर्मचारी करतात असा आरोप एका रुग्णाने केला आहे. कोरोना वार्डात जर दारु मिळत असेल तर उपचार कसा काय होणार असा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment