जळगाव : मुकेश जोरावरचंद माथुर अर्थात मुकेश या नावाने ओळखले जाणारे भारतीय पार्श्वगायक होते. २०२३ हे त्यांचे जन्म शताब्दी वर्ष. मुकेश यांचा जन्म दि. २२ जुलै १९२३ तर मृत्य दि.२७ ऑगस्ट १९७६ रोजी झाला. आपल्या सुमधुर आवाजाने अवघ्या बॉलिवुड वर अधिराज्य करणार्या ह्या कलावंतानी गायलेली गाणी हि आजच्या पिढितील तरुण तरूणींच्या ओठी आहेत. अजरामर अशी गाणी त्यांनी भारतीय चित्रपटांसाठी गायली व अजरामर केली. मुकेश यांच्या जन्म शताब्दी वर्षाची सांगता दि. २२ जुलै २०२३ रोजी होत असून या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या कलावंतांनी त्यांनी गायलेल्या गीतांचे सादरीकरण करून मुकेश यांना आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम दि. २२ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता रोटरी क्लब हॉल, गणपती नगर, येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरवातीला जळगाव शहरातील दोन अष्टपैलू व हरहुन्नरी कलाकार कै. गिरीश मोघे व कै. राजेंद्र उर्फ बापू बाविस्कर तसेच चांदोरकर प्रतिष्ठानचे विश्वस्त व उपाध्यक्षा दीपिका चांदोरकरांचे वडील कै. दत्ता सोमण या सर्वांचे नुकतेच निधन झाल्यामुळे सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व हा कार्यक्रम त्यांना अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती शुभांगी भारदे (उप-जिल्हाधिकारी) व श्री. भालचंद्र पाटील (व्यवस्थापकिय संचालक, वेगा केमिकल्स प्रा. लि.) म्हणून उपस्थित होते. सुरवातीला प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त श्री. दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. प्रमुख पाहुणे या नात्याने सौ शुभांगी भारदे व श्री. भालचंद्र पाटील यांनी दीपप्रज्वलन केले. प्रतिष्ठानच्या वतीने पाहुण्यांचा व कलावंतांचा सत्कार प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. शरद छापेकर, श्री. भालचंद्र पाटील व सौ. शुभांगी भारदे यांनी केले. आणि सुरू झाला मुकेश यांनी गेलेल्या गाण्यांचा सुरेल प्रवास. हा प्रवास उलगडून दाखविला जळगावचे ज्येष्ठ कलाकार श्री. आर. डि. , वैशाली शिरसाळे, प्राजक्ता केदार व ऐश्वर्या परदेसी यांनी.
कलावंतांनी या कार्यक्रमात खालील गीते सादर केली.
भुली हुयी यादे हमे इतना ना सताओ, आ लौटके आजा मेरे मित बुलाते है, किसी राह मे किसी मोडपर, ओ मेरे सनम ओ मेरे सनम, फुल तुम्हे भेजा है खतमे, क्या खुब लगती हो बडी सुंदर दिखाती हो, वो चांद खिला वो तारे हसे , दिल तडप तडप के , जाने कहा गये वो दिन, जिना यहॉ मरना यहा इसके सीवा जाना कहा. अशी एक ना अनेक अजरामर गीतं सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी केले तर ऋण निर्देश दिपक चांदोरकर यांनी केले.