कंपनीतील साहित्य चोरणा-यास अटक

On: July 25, 2023 8:05 PM

जळगाव : एमआयडीसी परिसरातील रायेटेक्स फार्मास्युटीकल्स या कंपनीच्या स्टोअर रुम मधील सुमारे 86 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य चोरी करणा-या चोरट्यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सागर अशोक गायकवाड (रा. भिलाटी मेहरुण जळगाव)असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. प्रशांत दिलीपकुमार कोठारी यांनी या घटनेप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुधाच्या  कॅन, पाण्याची मोटार अशा वस्तूंचा या चोरीत समावेश होता.   

चोरी झालेल्या मुद्देमालापैकी 75 हजार 500 रुपये किमतीचे एस.एस. स्पेअर लिड पाच लीटर मापाचे 755 नग जप्त करण्यात आले आहे. अटकेतील सागर गायकवाड याने हा गुन्हा त्याच्या अल्पवयीन साथीदारासह केल्याची कबुली दिली आहे. पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील उप निरीक्षक रविंद्र गिरासे, दिपक जगदाळे सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे. कॉ. रामकृष्ण पाटील, सचिन मुंढे, पो.ना. किशोर पाटील, पो.कॉ. साईनाथ मुंढे, सचिन पाटील, ललीत नारखेडे, नाना तायडे, किरण पाटील आदींनी या तपासकामी व कारवाईकामी सहभाग घेतला. पुढील तपास पो.हे.कॉ. रामकृष्ण साहेबराव पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment