नवी दिल्ली : लॉकडाऊन काळातील आर्थिक अडचणीमुळे सन 2020-21 मधे रेल्वे कर्मचा-यांना पगार मिळणार नसल्याचा चुकीचा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. सदर मेसेज चुकीचा अर्थात फेक असुन तसा कुठलाही निर्णय रेल्वेने घेतलेला नाही.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. लॉकडाऊनचे निर्बंध उठवण्यात आले आहेत. असे असले तरी अर्थव्यवस्था अद्याप रुळावर आलेली नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचा-यांना सन 2020 -21 कालावधीत वेतन दिले जाणार नसल्याचा एक संदेश व्हायरल झाला आहे. हा संदेश फेक असल्याचे स्पष्टीकरण पीआयबी कडून देण्यात आलेले आहे. अनेक जण कुठलीही शहानिशा न करता असे संदेश फारवर्ड करत आहेत. त्यामुळे पीआयबी कडून फॅक्ट चेक च्या माध्यमातून खोट्या मेसेजची माहिती देण्यात येत आहे.