चोरीच्या तिन मोटार सायकलींसह चोरट्यास अटक

On: July 26, 2023 7:00 PM

जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीच्या आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. संतोष शांताराम सपकाळे (रा. जोशीवाडा मेहरुण जळगाव) असे अटकेतील मोटारसायकल चोरट्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या कबुलीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकलचा एक गुन्हा उघडकीस आला. याशिवाय त्याने चोरलेल्या एकुण तिन मोटार सायकली देखील पोलिस कोठडी दरम्यान काढून दिल्या आहेत.

अटकेतील संतोष शांताराम सपकाळे याने चोरी केलेल्या मोटार सायकलींपैकी एक मोटार सायकल जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीतून चोरी केली आहे. पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. अल्ताफ पठाण, रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, पो.ना. विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment