कंपनीच्या बंद गोडावून मधून चोरी करणा-यास अटक

On: July 26, 2023 9:04 PM

जळगाव : ब-याच दिवसांपासून बंद असलेल्या गोडावूनची खिडकी तोडून आतील लोखंडी वायरचे तिन बंडल चोरुन नेणा-यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सुभाष पंडीत पाटील असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. एमआयडीसी परिसरातील किरण मशीन टुल्स या कंपनीच्या गोडावून मधे चोरी करणारा, अटकेतील सुभाष पाटील हा याच कंपनीत यापुर्वी कामाला होता.

कंपनीचे एचआर मॅनेजर योगेश सोनार यांनी 24 जुलै रोजी झालेल्या या चोरी प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी करण्यात आलेला संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. न्या. श्रीमती सुर्वणा कुलकर्णी यांच्या न्यायालयाने सुभाष पाटील यास तिन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. इम्रान सैय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंढे, निलोफर सैय्यद, पो. चालक इम्तीयाज खान आदींनी या तपास व कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्यात कंपनीतील अजुन कुणी कामगार सहभागी आहेत काय याबाबत चौकशी व तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment