वस्तीगृहातील पाच बालिकांवर लैंगिक अत्याचार

On: July 27, 2023 8:46 AM
अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्यचार

जळगाव : मुलींच्या वस्तीगृहातील काळजी वाहकाने पाच बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. लैंगिक छळ करणा-या या काळजीवाहकाने या बालिकांसोबत अनैसर्गिक संगोग देखील केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या घटने प्रकरणी  वस्तीगृहाचा मुख्य संशयीत आरोपी (काळजीवाहक) तसेच महिला अधिक्षक, सचिव अशा तिघांविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश शिवाजी पंडीत, अरुणा गणेश पंडीत (अधिक्षक), भिवाजी दिपचंद पाटील (रा. तळई ता. एरंडोल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.  

खडके ता. एरंडोल येथे मुलींचे वस्तीगृह आहे. या वस्तीगृहात गणेश शिवाजी पंडीत हा काळजीवाहक म्हणून नेमणूकीला आहे. काळजीवाहक गणेश पंडीत याने वस्तीगृहातील बालिकांसोबत ऑगस्ट 2022 ते जून 2023 या कालावधीत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार बालिकांनी केली आहे. या पिडीत बालिकांनी या घटनेची माहिती संस्थेचे अधिक्षक आणि सचिव याच्याकडे देखील केली. मात्र त्यांनी या घटनेची माहिती लपवून ठेवल्याची बालिकांची तक्रार आहे. या बालिकांपैकी एक बालिका आदिवासी मागास समाजाची असल्याचे माहिती असतांना देखील हा प्रकार घडला आहे. या घटने प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप विभागीय अधिकारी सुनिल नंदवाळकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment