सराईत गुन्हेगाराचा हत्येनंतर पुरला मृतदेह

On: August 23, 2020 5:10 PM

पुणे : दारु पिऊन सतत त्रास देणा-या मित्राची दुस-या मित्राने साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याची घटना पुणे शहरातील कात्रज भागात घडली. हत्या केल्यानंतर मित्राचा मृतदेह आरोपीने घराच्या मागील बाजूस खड्ड्यात पुरण्याचे काम केले.
किरण डोळे असे हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी ओंकार संजय जोरी या संशयीतास ताब्यात घेत अटक केली आहे. ओंकार जोरी याने त्याच्या तिन साथीदारांच्या मदतीने सराईत गुन्हेगार किरण डोळे याचा खुन केल्याचे कबुल केले.
हत्या करण्यात आलेल्या किरण डोळे या सराईत गुन्हेगारावर पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वर्षांपूर्वी तडीपार करण्यात आले होते. पोलिसांच्या ताब्यातील आरोपी ओंकार जोरी हा किरणचा मित्र होता. किरण डोळे हा दारुच्या नशेत बुडाल्यानंतर आरोपी ओंकारच्या घरी जावून त्याच्या परिवाराला त्रास द्यायचा. त्यामुळे संतप्त ओकार जोरी याने आपया साथीदारांच्या मदतीने किरणची धारदार शस्त्राने हत्या केली.
खून केल्यानंतर ओंकार जोरी याने मयत किरण याचा मृतदेह त्याच्याच घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात पुरला. मात्र किरण घरी परत आला नाही त्यामुळे त्याच्या पत्नीने पोलिस स्टेशनला तक्रार दिली.
पोलिसांनी फरार झालेल्या ओंकार याचे घर गाठले. त्यावेळी त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे दुर्गंधीचा उगम असलेला खड्डा खोदला असता तेथे बेपत्ता किरण याचा मृतदेह पोलिसांना आढळला. या प्रकरणी ओंकार जोरी याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment