तिन वर्षापासून शाबीत फरार गुन्हेगारास अटक

On: August 1, 2023 6:54 AM

जळगाव : न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या शाबीत व तिन वर्षापासून फरार गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जयंत अनंत शिधये असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. जळगाव येथील चौथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडील कलम 138 नुसार दाखल खटल्यातील गुन्ह्यात त्यास  सन 2020 मधे शिक्षा सुनावण्यात आली होती. तो फरार असल्याने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हे.कॉ. विजयसिंग पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, प्रितम पाटील, विजय पाटील, ईश्वर पाटील, लोकेश माळी, मोतीलाल चौधरी आदींनी त्याला खोटे नगर परिसरातून अटक केली. तो खोटे नगर परिसरात वास्तव्यालाअसल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी जयंत शिधये याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment