शाळेत चोरी करणा-या तिघांना अटक

On: August 2, 2023 8:29 PM

जळगाव : शिरसोली गावानजीक असलेल्या पद्मालय इंग्लिश मिडीयम स्कुल मधील चोरीच्या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली आहे. अजय विजय भिल, किरण गोपाळ कोळी आणि मयुर गोपाळ बारी अशी शिरसोली गावातील अटक करण्यात आलेल्या तिघा तरुणांची नावे आहेत.

शिरसोली गावानजीक असलेल्या पद्मालय इंग्लिश मिडीयम स्कुलमधे 7 जून 2023 रोजी चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेत रोख 15 हजार रुपये, इलेक्ट्रीक मोटार, सिसीटीव्ही कॅमेरे, डिव्हीआर, इन्व्हरटर बॅटरी असा ऐवज चोरी झाला होता. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेत शाळेच्या स्टोअर रुमचा कडीकोंडा तोडून हा प्रकार करण्यात आला होता.

अधिक तपासाअंती हा चोरीचा प्रकार शिरसोली गावातीलच काही मुलांनी केल्याची माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली. त्या माहितीसह चौकशी, कबुली आणि तपासाअंती  तिघांना अटक करण्यात आली. अटकेतील तिघांना न्या. सुर्वणा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. जितेंद्र राठोड, पो.ना. समाधान टहाकळे, इम्रान सैय्यद, शुध्दोधन ढवळे, किशोर पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील तिघांकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील अजय विजय भिल आणि किरण गोपाळ कोळी या दोघांविरुद्ध शिरसोली गावात हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment