बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या वॉल कंपाऊंडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची ओरड सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने या कामात माती मिश्रित वाळूचा वापर केला असून सिमेंटच्या विटा वापरल्या आहेत. त्यामुळे या कामाच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या बांधकामांमध्ये जुने लोखंडी वापरण्यात आले असून त्यात वाजवीपेक्षा जास्त अंतर ठेवण्यात आले असल्याचे देखील म्हटले जात आहे. या कामाच्या माहितीचे फलक देखील लावण्यात आले नसून जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. या कामाच्या बाबत फलक लावला नसलयाने या कामात मोठा गैर व्यवहार होत असल्याची किसान सेनेची तक्रार आहे. त्यामुळे संबंधित कामाची गुण नियंत्रण विभागाकडून चौकशी करुन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी किसान सेंनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे, धनंजय अवचार, रामदास मोहे, शेख अब्दुल शेख लोकमान, संतोषराव घिवे, पुंडलिक खानजोड, विशाल बकाल, बंटी तांगडे ,आदी शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.