रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष – नऊ लाखात फसवणूक

On: August 3, 2023 11:27 AM

जळगाव : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत 9 लाख 65 हजार रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कर्मचा-याने आपल्या दोघा मुलांना रेल्वेत नोकरी मिळण्याच्या आमिषाला बळी पडून हा व्यवहार केल्याने फसगत झाली आहे. विश्वास व्यंकटेश वालवडकर असे फसवणूक झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.

भुसावळ येथील शांती नगर भागातील प्रकाश हरिचंद्र सोनवणे याने विश्वास व्यंकटेश वालवडकर यांच्याकडून रक्कम घेतल्यानंतर रेल्वेच्यानावाने बनावट व खोटी कागदपत्रे तयार करुन ते विश्वास वालवडकर यांना दिले. मात्र मिळालेले कागदपत्र बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रकाश सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिलीप चौधरी करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment