पिस्तुल व चाकूच्या धाकावर तरुणाचे अपहरण

On: August 23, 2020 7:10 PM

उल्हासनगर : पिस्तूल व चाकूच्या धाकावर उल्हासनगर येथील तरुणाचे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता अपहरण करण्यात आले होते. त्या तरुणाचे अपहरण केल्यानंतर त्याच्या वडीलांना दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. मात्र खंडणीची मागणी मान्य झाली नाही म्हणून तरुणाला रस्त्यावर फेकून देण्यात आले.

शामलाल अनवाणी असे अपहरण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून कॅम्प नं -५ भाटिया चौक परिसरातून त्याचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्याच्या वडीलांना मागणी केलेली दहा लाखाची खंडणी मान्य झाली नाही. त्यामुळे शामलाल अनवाणी या तरुणास सायंकाळी साडे पाच वाजता पाले गाव डी मार्ट येथे फेकून देण्यात आले. त्याने हिल लाईन पोलिस स्टेशनला आपल्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला. त्याच्या तक्रारीनुसार हिल लाईन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटिव्ही कॅमेरे व फुटेजच्या आधारे अपहरणकर्त्यांना शोध घेतला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment